26.6 C
New York

Sharad Pawar : जय पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले…

Published:

बारामती

लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) हाय व्होल्टेज बारामती मतदार संघात अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार Sharad Pawar अशी लढत होणार आहे. अजित पवार गटाकडून सुमित्रा पवार (Sumitra Pawar) तर शरद पवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) रिंगणात आहे. प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप सुरू असताना अजित पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवार यांचे नातू जय पवार (Jay Pawar) यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जय पवार म्हणाले की, शरद पवार यांचे राजकारण कशा पद्धतीने आहे. साहेब कसे नेते आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे तसेच हे संपूर्ण महाराष्ट्र सह देशाला माहित आहे.

जय पवार म्हणाले की, जय पवार हे आई सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करत होते. यावेळी त्यांनी थेट पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यालाच हात घातला. अजितदादांनी अनेक वर्ष साहेबांच सगळंच ऐकलं. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या आधी दादांनी फडणवीसांसोबत शपथविधी केला आणि त्याच दिवशी दुपारी सर्वजण दादांच्या विरोधात गेले. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे जर हा निर्णय दादांचा स्वतःचा निर्णय होता तर साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री केलं असतं का? आपल्याला सर्वांना माहिती की साहेब कसे नेते आहेत असं असतं तर दादांना त्यांनी संधीचं दिली नसती. पण हे खरं कोणी तुम्हाला सांगत नाही असं मोठं विधान जय पवार यांनी केलं आहे.

जय पवार म्हणाले की, आज ही निवडणूक त्यांनी भावनिक पद्धतीने चालू केलेली आहे. कारण 15 वर्षे सुप्रियाताई खासदार होत्या. मला काल पुरंदरमधले ही लोक बोलले जर हे दोन गट झाले नसते तर त्यांच्याकडे बोलायला मुद्देच नव्हते. आता हे दोन गट झाले आहेत म्हणून त्यांना भावनिक बोलावं लागत आहे. साहेबांच्या बाजूनेच का आपण भावनिक व्हायचं दादांच्या बाजूने का नाही? असा जय पवार यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img