26.6 C
New York

Sanjay Raut : पंतप्रधानांच्या ‘या’ वक्तव्यावर राऊतांचा हल्लाबोल…

Published:

मुंबई

देशाच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून देशातील संपत्ती जमा करून ती मुसलमानांमध्ये वाटतील, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बन्सवाडा भागात केले. त्यांच्या या विधानामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांच्याकडून पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. कोणाला किती मुले आहेत? हा प्रचाराचा मुद्दा असू शकतो. पण आता तर हे (पंतप्रधान नरेंद्र मोदी) आमच्या आया-बहिणींच्या मंगळसुत्रांपर्यंत पोहोचले आहेत, असा हल्लाबोल राऊतांकडून करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना खासदार संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी हे आता काळजीवाहू पंतप्रधान आहेत. कारण आचारसंहिता सुरू झाल्यानंतर कोणीही मंत्री राहात नाही किंवा पंतप्रधानही राहात नाही. ते आता भाजपाचे नेता आहेत. पण असे वक्तव्य कोणी मोठा नेता करत असेल ती दुःखाची बाब आहे. आता हे आमच्या आया-बहिणींच्या मंगळसुत्रांपर्यंत पोहोचले आहेत. कोणाला जास्त मुले आहेत, कोणाला कमी मुले आहेत, हा काय प्रचाराचा मुद्दा असू शकतो का?, असा खोचक प्रश्न यावेळी त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

तर, तुम्ही विकासांच्या मुद्द्यांवर का नाही बोलत? तुम्ही देशाच्या संरक्षणावर, देशातील राष्ट्रीय मुद्द्यांवर, मागील 10 वर्षांमध्ये तुम्ही देशात काय काय केले किंवा पुढे काय करणार, यांवर का नाही बोलत. या प्रकारची भाषा यांच्याव्यतिरिक्त कोणी वापरली असती, तर काय केले असते? पण अशा प्रकारची वक्तव्ये यांच्याकडून करण्यात येत आहेत, म्हणजेच यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना पराभवाची भीती वाटत आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारची वक्तव्ये करण्यात येत आहेत, अशी खोचक टीकाही यावेळी संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली.’

निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा…


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्यांकांबाबत केलेल्या विधानाची दखल निवडणूक आयोगाने केली किंवा नाही, हे माहीत नाही. पण आमच्या पक्षाच्या प्रचार गीतात जय भवानी आणि हिंदू धर्म हे शब्द आल्यानंतर त्यांना त्रास व्हायला लागला. त्या शब्दांवर बंदी घालण्यात येत आहे. भवानी माता ही छत्रपती शिवरायांची कुळदेवी आहे, त्यावर यांना आक्षेप आहे, पण पंतप्रधान मोदी यांचा हात माता-भगिणींच्या मंगळसुत्रापर्यंत जात आहे, ते निवडणूक आयोगाला दिसत नाही. कारण निवडणूक आयोग ही भाजपाची शाखा आहे, असे सणसणीत टोलाच राऊतांनी लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img