26.6 C
New York

Sangli Lok Sabha : ‘मविआ’चे टेन्शन वाढले, पाटलांची माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर निवडणूक लढणार

Published:

सांगली

सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे. काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडखोरीकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज त्यांनी कायम ठेवल्याने आता सांगली लोकसभा तिहेरी लढत होणार आहे. आज निवडणूक आयोगाकडून (Election Commission) विशाल पाटील यांना उमेदवारी चिन्ह देखील देण्यात आले आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने चंद्रहार पाटील, भाजपच्या वतीने संजय काका पाटील तर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात यावा याकरिता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे.

विशाल पाटील यांनी निवडणूक अर्ज दाखल केला त्यावेळी तीन चिन्हांची मागणी केली होती मात्र निवडणूक आयोगाने देण्यात आलेल्या शिट्टी टेबल आणि गॅस सिलेंडर हे चिन्ह मागितले होते. विशाल पाटील यांनी मागितल्यांपैकी एकही चिन्ह मिळाले नाही. निवडणूक आयोगाने विशाल पाटील यांना लिफाफा निवडणूक चिन्ह दिले आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांना शिट्टी चिन्ह बहाल केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img