8.9 C
New York

Plants : ‘ह्या’ वनस्पतींचे सेवन केल्यास तुम्हाला वाटेल थंडा थंडा कूल कुल…

Published:

उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. पुढील दोन महिन्यात हा ऋतू आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्य बिघडण्याची भीती आहे. उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आपण सर्वजण थंड वाटणारे अर्थात कूलिंग इफेक्ट असलेले पदार्थ खातो. त्याऐवजी आपल्या घरातच असलेल्या औषधी वनस्पतींचे सेवन करुन तुम्ही उष्णतेपासून बचाव करू शकता. आपले शरीर नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यासाठी तुम्ही पुढील पाच ताज्या वनस्पतींचे (Plants) सेवन केल्यास तुम्हाला थंडा थंडा कूल कुल वाटेल.

त्यातील पहिली वनस्पती म्हणजे कोथिंबीर…
कोथिंबीरमध्ये शरीर थंड ठेवण्याचे गुणधर्म आहेत. ती अँटिऑक्सिडंट्समध्ये देखील आहे. याशिवाय सुरकुत्यांपासूनही संरक्षण प्रदान करते. चटणीसह प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही या दिवसांमध्ये कोथिंबीर प्राधान्याने वापरू शकता.

दुसरी वनस्पती पेपरमिंट म्हणजेच पुदिना…
बहुतेक लोक उन्हाळ्यात पुदिन्याचा वापर करतात. पुदीना ही थंडगार औषधी वनस्पती आहे. पुदिन्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. पुदिन्याचे पाणी प्या किंवा चटणी बनवून खा. उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने शरीराला कमालीचा थंडावा मिळतो. पुदिन्याचे पाणी पिल्याने शरीर डिटॉक्सही होते.

बडीशेप देखील अशीच एक वनस्पती आहे. बडीशेप शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पोटफुगीवर तसेच पचन सुधारण्यास मदत करते. बडीशेप पारंपरिकपणे शरीराला थंड करण्यासाठी वापरली जाते. थंडाईमध्येही बडीशेप वापरली जाते. यामुळे शरीराची उष्णता कमी होते. भाजी करतानाही तुम्ही त्यात बडीशेप वापरू शकता.

वेलची देखील उन्हाळ्यात आश्चर्यकारक परिणाम देणारी वनस्पती आहे. वेलचीमध्ये शीतल संयुगे असतात जी शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. शिवाय पचनास मदत करतात. मसाल्यांमध्ये वेलचीचा सर्वाधिक वापर केला जातो. वेलची जेवणातील चवीसोबत सुगंध वाढवते, शिवाय तुम्हाला थंड आणि उत्साही वाटते.

जास्वंदीचे फूल अति उष्णतेवर प्रभावी मानले जाते. त्याच्या सेवनाने शरीराला परिणामकारकरित्या थंड करते. तुम्ही जास्वंदीचा चहा बनवून देखील पिऊ शकता. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. यासोबतच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. उन्हाळ्यात थंड राहण्यासाठी जास्वंदीचा चहा प्यावा….

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img