9.5 C
New York

Mahayuti : महायुतीची नाशिक उमेदवारी ‘या’ कारणांमुळे बाकी

Published:

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024)महायुतीच्या (Mahayuti)जागावाटपावरुन सुरुवातीपासूनच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group)आणि राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar Group)गटातील लोकसभा उमेदवारीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. महायुतीच्या जागावाटपामध्ये सुरुवातीलाच अजितदादांच्या राष्ट्रवादीला साताऱ्याची जागा सोडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)आधीपासूनच आग्रही होते. त्यासाठी उदयनराजे हे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले होते.

त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केलेली साताऱ्याची जागा भाजपला सोडण्यात आली. असं असलं तरीदेखील ही जागा सोडताना अजित पवार गटाकडून राज्यसभेचा शब्द घेण्यात आल्याची माहिती समोर आली. राष्ट्रवादीनं जागा सोडल्यानंतर भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. पण ही जागा भाजपला सोडताना राष्ट्रवादीनं काय मिळवलं? याबद्दल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel)यांनी माहिती दिली आहे. सातारा लोकसभेच्या बदल्यात राष्ट्रवादीला पियुष गोयल यांची राज्यसभेची जागा घेतल्याचे पटेल यांनी सांगितले आहे. त्यामुळं अजितदादा गटाने साताऱ्याची जागा भाजपला दिली, असेही यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी सांगितले.

त्याचवेळी दुसरीकडे मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघावरचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने सोडलेला नाही, असेही यावेळी प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीचे घोंगडे भिजत पडलेले आहे. त्याचवेळी दुसरीकडे मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघावरचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने सोडलेला नाही, असेही यावेळी प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीचे घोंगडे भिजत पडलेले आहे.महायुतीत जागावाटपावरुन आत्तापर्यंत रस्सीखेच पाहायला मिळाली. महायुतीच्या जागावाटपाचं तसं फायनल शिक्कामोर्तब झालेले नाही. भाजपकडून आत्तापर्यंत 25 उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीमधला दुसरा पक्ष अर्थात शिवसेना शिंदे गटाला आत्तापर्यंत 10 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने चार उमेदवार जाहीर केले आहेत. तरी अजूनही काही जागांवरील नाराजीनाट्य सुरुच आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच महायुतीकडून सातारा, छत्रपती संभाजीनगर या दोन्ही जागांवरील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. साताऱ्यात भाजप नेते उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांना जाहीर करणयात आली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र अद्याप काही सुटलेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव सुचवले होते. नाशिक लोकसभेच्या जागेवरुन शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदे घेऊन नाशिक लोकसभेतून आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. एका मतदारसंघामुळे महायुतीत तणाव निर्माण होऊ नये, असे म्हणत त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याचे जाहीर केले. असे असले तरी देखील नाशिमधून अद्यापही शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झालेली नाही.

त्याचबरोबर महायुतीकडून काही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्यापही जाहीर केलेले नाहीत. त्यात कल्याण डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई दक्षिण यासह इतर काही जागांवरील उमेदवार महायुतीकडून जाहीर केलेली नाही. या जागांवर अद्यापही महायुतीत एकमत झाल्याचे पाहायला मिळत नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img