26.6 C
New York

MahaVikas Aghadi : महाविकास आघाडी मध्ये नाराजी नाही – सुरेश म्हात्रे

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

निवडणूक (LokSabha Elections) आली की सोसाट्याचा वारा येतो त्यात पालापाचोळा उडून जातो. निवडणूक जवळ आली की अशा घटना घडत असतात. प्रत्यक्षात महाविकास आघाडी मध्ये नाराजी नाही, शिवसेना ठाकरे गटाला त्यामुळे काही फरक पडला नाही किंवा महाविकास आघाडीला त्यामुळे काही फरक पडणार नाही असे भिवंडी लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारचे उमेदवार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांनी कल्याणात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कल्याण मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती. पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ.वंडार पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी प्रशांत माळी, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील, काँग्रेसचे मुन्ना तिवारी, बॉबी जपजित माटा, शकील खान, विमल ठक्कर, प्रवीण साळवे, राष्ट्रवादीचे संदीप देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भिवंडी लोकसभेत विकासाच्या नावाखाली मुलभूत प्रश्न मार्गी लागले नसल्याची खंत महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केली.भिवंडी लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर विकासाची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर सादर करणार असल्याचेही त्यांनी या प्रंसगी सांगितले.

पत्रकार परिषदेत कल्याण लोकसभा मतदार संघातील महविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली देरेकर यांनी वाढत्या संकुलांमुळे पाणी प्रश्न भीषण झाला असल्याचे सांगितले.

निवडणूक आली की सोसाट्याचा वारा येतो त्यात पालापाचोळा उडून जातो अशी टीका सुरेश म्हात्रे यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटातून काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश या प्रश्नाला उत्तर देताना सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक जवळ आली की अशा घटना घडत असतात. प्रत्यक्षात महाविकास आघाडी मध्ये नाराजी नाही, शिवसेना ठाकरे गटाला त्यामुळे काही फरक पडला नाही किंवा महाविकास आघाडीला त्यामुळे काही फरक पडणार नाही असे सांगताना निवडणूक आली की सोसाट्याचा वारा येतो त्यात पालापाचोळा उडून जातो अशी टीका केली.

कपिल पाटील राज ठाकरे यांची भेट घेतली याबाबत बोलताना सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्यावर टीका केली. कपिल पाटील सध्या कुणा कुणाची भेट घेतायत, 2014 ची निवडणूक असून 2019 च्या निवडणूकीत कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या मोहल्ल्यात प्रचाराला गेले होते का ? असा सवाल केला. पुढे बोलताना म्हात्रे यांनी आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक रस्त्यावर, कपिल पाटील दिसतायत याचे सगळं श्रेय मतदारांचे आहे. त्यांनी कपिल पाटील यांना दोन वेळा संधी दिली आणि आता तिसऱ्या वेळेसाठी रस्त्यावर आणले असा टोला याप्रसंगी लगावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img