बोर्ड परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार हा सवाल पालकांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत (Maharashtra Board Results 2024) आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाही काॅपीमुक्त परीक्षा झाल्यात. मंडळाकडून कित्येक महिन्यांपासून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी काम सुरू होते. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे या परीक्षेच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच निकाल हा जाहिर केला जाऊ शकतो. अगोदर बारावीचा निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहिर होऊ शकतो.
विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार यंदा दहावी आणि बारावीचा निकाल हा ‘मे’च्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो. लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहिर होण्याच्या अगोदर दहावी आणि बारावीचे निकाल जाहिर होऊ शकतात. राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली तर दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू झाली होती. 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते.
विशेष म्हणजे मे महिन्यातच दोन्ही वर्गांचे निकाल जाहीर व्हावेत यासाठी राज्य मंडळाकडून दैनंदिन फॉलोअप सुरू असून, निकालाचे काम जलदगतीने करण्यासाठीच्या आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी माध्यमांना दिलेली आहे. पुढील महिन्यात निकाल जाहीर होणार हे जवळपास आता फिक्स झालेले आहे यामुळे आता आपण दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल कसे पाहायचे हे देखील जाणून घेणार आहोत.