26.6 C
New York

Lok Sabha Elections : ‘वंचित’ कडून नाशिक, जळगाव मधून ‘या’ उमेदवारांची घोषणा

Published:

मुंबई

वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Alliance) वतीने लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये वंचित कडून जळगाव (Jalgaon Lok Sabha) आणि नाशिकचे (Nashik Lok Sabha) उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. वंचितच्या सोशल मीडिया अकाउंट वरून यादी प्रसिद्धी करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची नववी यादी जाहीर झाली असून, पक्षाच्या एक्स हॅंडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. यात जळगाव मतदारसंघातून युवराज जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर नाशिकमधून करण गायकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

याआधी जळगावमधून प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने जळगाव मतदारसंघातून प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा यांच्या जागी युवराज भीमराव जाधव यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे.

तसेच, नाशिकमधून वंचित बहुजन आघाडी कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी दिल्याने येथे जोरदार लढत होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img