26.6 C
New York

Earth Day: जागतिक वसुंधरा दिवस…

Published:

पृथ्वी (Earth Day) सजीवसृष्टीचे अस्तित्व असलेला ब्रम्हांडातील ज्ञात गृह. आपल्या सूर्यमालेतील तिसरा गृह. 4 अब्ज 6 कोटी वर्षांपूर्वी ब्रम्हांडातील म्हाविस्फोटातून सूर्याची निर्मिती झाली आणि थोड्याच म्हणजे काही लाख वर्षांच्या कालावधीत धूळ आणि वायूच्या घणरुपातून आपल्या सूर्यमालेतील गृहांच्या निर्मितीस सुरुवात झाली. पृथ्वीचा जन्मही त्याच दरम्यान झाला.

पुढे 3.8 अब्ज वर्षांनंतर पाण्याच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झाली. पण, तुम्हाला माहित आहे का, आपल्या पृथ्वीवरून ही सजीवसृष्टी आजपर्यंत पाचवेळा नष्ट झाली आहे. आणि आता मानवामुळे सहाव्यांदा पृथ्वीवरील जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठयावर येऊन ठेपली आहे. आज 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. त्यानिमित्त जाणून घेऊ पृथ्वीच्या या प्रवासविषयी…


2.4 अब्ज वर्षांपूर्वी संपूर्ण पृथ्वी बर्फासारखी गोठली. पृथ्वीवरील ऑक्सिजन आणि कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण कमालीचे घटले आणि पृथ्वीवरील सजीवसृष्टी नष्ट झाली. यालाच हिमयुग संबोधले गेले. हिमयुगानंतर 44 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचे तापमान वाढले. समुद्राची पाणी पातळी वाढली. या काळात पृथ्वीवर जीवसृष्टी वाढत होती. पण तापमानवाढीमुळे समुद्रातील जवळपास 70 टक्के जीव नष्ट झाले. या विनाशातून वाचलेल्या जीवांनी पृथ्वीवर नवी जैव व्यवस्था निर्माण करण्यास सुरुवात केली. 42 ते 35 कोटी वर्षांपूर्वीच्या कालावधीत पृथ्वीच्या मातीतून पहिली झाडे निघाली आणि प्राणीही पाण्यातून जमिनीवर रहिवास करू लागले.


पृथ्वीच्या 23 ते 24 कोटी वर्षांपूर्वीच्या काळात पृथ्वीवर डायनासोर अस्तित्वात आले. त्यांनी तब्बल 15 कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य केले.
25 कोटी वर्षांपूर्वी सद्याच्या सायबेरिया प्रांतावर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि पृथ्वीवरील 90 टक्केहून अधिक जीव नष्ट झाले. 6 कोटी 6 लाख वर्षांपूर्वी आज ज्या ठिकाणी मेक्सिको हा देश वसला आहे, तिथे एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला. त्यामुळे उठलेले धुळीचे वादळ आणि वायूंच्या आवरणामुळे सूर्याची किरणेच पृथ्वीवर पोहोचू शकली नाहीत आणि त्यामुळे झालेल्या हवामान बदलामुळे डायनासोरसह उर्वरित प्राणी नामशेष झाले. पण, या घटनेनंतर पृथ्वीवर सस्तन प्राण्यांची संख्या वाढू लागली.


डायनासोर युगानंतर पृथ्वीवर मानव ही आजवरची सर्वात बुद्धिमान जमात अस्तित्वात आली. मानवाच्याही पृथ्वीवर सहा जाती अस्तित्वात होत्या. पण, आजच्या मानवाने म्हणजे तुम्ही – आम्ही जे होमो सेपियनस म्हणून ओळखले जातो, त्याने मानवाच्या बाकीच्या जाती नष्ट केल्या. इतकेच नाही तर गेल्या ५० वर्षांत मानवाने पृथ्वीवरील ६० टक्के सस्तन प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी नष्ट केले असल्याचा दावा वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर अर्थात WWF या संस्थेने आपल्या अहवालात केला आहे. एवढेच नाही तर मानवाने स्वतः केलेल्या तथाकथित विकासामुळे केवळ माणूसच नाही तर ही पृथ्वी विनाशाच्या उंबरठयावर येऊन ठेपली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img