26.6 C
New York

Awas Beach:’या’ गोष्टींचा आनंद घेण्यासाठी अलिबागला जायलाच हवं!

Published:

महाराष्ट्रातील अलिबाग, कोकणपट्टा, मुंबई, डहाणू येथे अथांग समुद्र आहे. त्यातच सध्या अलिबागला लोक फिरायला जाण्यास पसंत करतात. झाडांची हिरवळ आणि अथांग समुद्र त्यातच रेवदंडा किल्ला त्यामुळे अलिबागला वेगळा बहर येतो. अलिबागमध्ये देखील बरेच समुद्रकिनारे आहेत. त्यातला एक म्हणजे आवस (Awas Beach) बीच. हा समुद्र किनारा अलिबागच्या बाहेरील बाजूस आहे.

मांडवापासून सुमारे 7 किमी अंतरावर हा बीच वसलेला आहे. आवास बीच सुरुच्या झाडांनी नटलेला सोनेरी वाळूचा सुंदर भाग आहे. अलिबागचा हा एक गुप्त समुद्र किनारा आहे. आजकालच्या धाका -धाकीच्या जीवनात विश्रांतीसाठी हा समुद्र किनारा एक उत्तम पर्याय आहे. इथे तुम्ही रोमँटिक डेट किंवा एकांतात वेळ घालवण्यासाठी आदर्श आहे. समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावात काही सुंदर रिसॉर्ट्स आहेत. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे स्वच्छ किनारा. त्याचसोबत शांत सौंदर्य. पर्यटकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे करणं इथे फार पर्यटकांचा अभाव आहे.


अलिबागमधील आवास बीच हा सर्वात कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे जो संपूर्ण शांतता आणि निर्मळता प्रदान करतो. कारण शहरी जीवनातील त्रासापासून दूर आहे. तुम्ही येथे मनसोक्त फिरू शकता. अप्रतिम सूर्यास्ताचा आनंद देखील येथे घेऊ शकता. अलीकडील व्यापारीकरणामुळे आवास बीच अजूनही दूर आहे. त्यामुळे शांतीसाठी हे जास्त आकर्षित करते. येथे तुम्ही सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता, विशेषत: सूर्यास्ताच्या वेळी. आवास बीचअसून किहीम समुद्र किनारा जवळ आहे. तुम्ही तेथे पॅरासेलिंग, जेट स्की राइड इत्यादी विविध प्रकारच्या जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता.

जुने शिवमंदिर, कनकेश्वर देवस्थान मंदिर हे जवळचे आणखी एक आकर्षण आहे. वरसोली बीचवर देखील जाऊ शकता जो अलिबागमधील आणखी एक कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे आणि आवास बीचपासून अंदाजे 11 किलोमीटर अंतरावर आहे. आवस बीचला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ हिवाळ्याच्या काळात आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत, एकूण तापमान अगदी शांत राहते, किमान 140C (अंदाजे) ते कमाल 300C (अंदाजे) पर्यंत असते. तुम्हाला जर तिथे जायचे असेल तर अलिबाग शहरातून, तुम्हाला आवास बीचवर जाण्यासाठी कॅब किंवा रिक्षा करावी लागेल. पुणे, पनवेल, मुंबई ही अलिबागच्या जवळची दोन प्रमुख शहरे आहेत. सर्वात जवळची रेल्वे स्थानके पनवेल आणि कोशा येथे आहेत आणि सर्वात जवळची विमानतळे मुंबई आणि पुणे येथे आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img