26.6 C
New York

Amitabh Bachchan: बॉलीवूडचे बिग बी धमाकेदार भूमिकेत; चित्रपटाचा लुक समोर

Published:

बॉलीवूडचे बिग बी पुन्हा येणार चाहत्यांसमोर. ‘कल्कि 2898 एडी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातून ‘अश्वत्थामा’चा पहिला लूक समोर आला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ‘अश्वत्थामा’च्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांना त्यांचा धमाकेदार लुक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील लूक पोस्टर व एक टीझर रिलीझ करण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांनी स्वतः या चित्रपटाचा लुक पोस्टर शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. एकापाठोपाठ एक कलाकारांचे फर्स्ट लूक समोर येत होते. त्यातच आता बिग बीं चा लुक समोर आला आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट असून प्रभास आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन खास भूमिका साकारणार आहेत.

अमिताभ बच्चन यांनी २०० हुन अधिक चित्रपटात काम केले आहे. २०२३ मध्ये घूमर या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. २०२४ मधला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. चाहत्यांकडून बिग बींना नव्या चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img