मुंबई
बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर मागील आठवड्यात बिष्णोई गँगकडून (Bishnoi Gang) गोळीबार करण्याची घटना ताजी असताना विष्णू गँगकडून शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना लॉरेन्स बिष्णोई गँगने धमकी (Threat) दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही तासांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला होता. फोन करत 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर सलमान खानसारखं प्रकरण करण्याची धमकी देण्यात आली आहे. रोहित गोडारा नावाच्या व्यक्तीने हा फोन केला होता. ऑस्ट्रेलियावरून फोन केला असल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे. या फोनमुळे एकच खळबळ उडाली आहे. बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन जरी आला असला तरी जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.
सलमान खानच्या घरावर केलेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी 48 तासांमध्ये आरोपींना गुजरातमधून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. सध्या ह्या दोन्ही आरोपींकडून तपास सुरू आहे. आज सलमान खानच्या घरावर केलेल्या गोळीबारातील बंदूक शोधण्यासाठी मुंबई पोलीस सुरतला गेले आहे.