4.2 C
New York

Covid Vaccine : 67 दशलक्ष मुले जीवनरक्षक लसींपासून वंचित – डॉ.जीनेंद्र जैन

Published:

रमेश औताडे, मुंबई

कोविड महामारी (COVID-19) दरम्यान पाळण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) कालावधीत नियमित लसीकरणामध्ये (Covid Vaccine) घट झाली असून जवळपास 67 दशलक्ष मुले जीवनरक्षक लसींपासून वंचित आहेत. असे युनिसेफने सादर केलेल्या “द स्टेट ऑफ द वर्ल्डस चिल्ड्रन ” या अहवालात दिसून आले आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत जागतिक लसीकरण तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे प्रमुख डॉ.जीनेंद्र जैन (Jinendra Jain) यांनी दिली.

देशात गोवरच्या प्रकरणांमध्येही चिंताजनक वाढ होत आहे. 2022 मध्ये, अंदाजे 11 लाख मुलांनी भारतातील गोवर लसीचा पहिला डोस चुकवला, ज्यामुळे गोवर लसीकरणात सर्वात जास्त अंतर असलेल्या दहा राष्ट्रांमध्ये भारताची समावेश झाला आहे असे जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस केंद्रांचा अहवाल रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) अहवालात आढळून आले असे लहान मुलांचे तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे सहयोगी डॉ. अंकित गुप्ता यांनी सांगितले.

2022 मध्ये 40,967 प्रकरणांची नोंद झाली असून 37 देशांपैकी भारत हा एक असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. रोगप्रतिकारशक्ती विषयी बोलताना डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे की , लसीकरण हा बालकांच्या संगोपनातील महत्त्वाचा घटक आहे. पोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजिण्या अशा विविध आजारांपासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, यादृष्टीने लसीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतात 26 रोगांसाठी लस आहेत परंतु सामान्यतः फक्त 10-12 रोगांवर लसीकरण केले जाते.

पौगंडावस्था, गर्भवती महिला आणि 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्धांसह सर्वच वयोगटातील लोकांसाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे आणि इन्फ्लूएंझा, न्यूमोनिया आणि हिपॅटायटीस यांसारख्या विविध संक्रमणांपासून संरक्षण करण्यात मदत करते असे बालरोग तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे सहयोगी डॉ बादशाह खान यांनी सांगितले.

डिप्थीरिया, टिटॅनस आणि डांग्या खोकला (पेयुसिस) विरुद्ध लढण्यासाठी DTaP लस महत्त्वपूर्ण आहे, तर एमएमआर लस गोवर, गालगुंड आणि रुबेला विरुद्ध प्रभावी आहे. मेनिंजायटीस मेनिन्गोकोकल लसीने, व्हेरिसेला लसीमुळे कांजण्या, आयपीव्ही लसीने पोलिओ आणि न्यूमोकोकल लसीद्वारे न्यूमोनिया टाळता येतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंधाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकार एचपीव्ही लस देखील पुरवते असे डॉ. अंकित गुप्ता यांनी सांगितले.

लसीकरणाचे दर देशभरात कमी होत आहेत मात्र लसीकरणाबाबत जागरुकता नसल्यामुळे लहान मुले आणि प्रौढावर लसीकरणाचा परिणाम होत आहे. गालगुंड आणि एमएमआर लस वगळल्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. न्यूमोनियाची लस न घेतल्याने होणारी गुंतागुंतीची प्रकरणे वाढत आहेत.
सरकार मोफत लस देत असूनही, अनेक लोक अजूनही लसीकरण करत नाहीत आणि त्यामुळे आरोग्यासंबंधी गुंतागुंत वाढते . कोविड-19 साथीच्या आजारापूर्वी किंवा त्यादरम्यान जन्माला आलेली लसीकरण न झालेली मुले आता विविध लस-प्रतिबंधात्मक आजारांनी ग्रस्त आहेत. असे डॉ बादशाह खान यांनी सांगितले.

पर्यायी लस जसे की न्यूमोकोकल लस, फ्लू लस, कांजिण्यांसाठी व्हॅरिसेला लस, हिपॅटायटीस ए लस प्रौढांना द्यावी. फ्लू किंवा इन्फ्लूएंझा लस दरवर्षी सर्व वयोगटातील लोकांनी विशेषतः मधुमेह, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांनी घ्यावी. न्यूमोकोकल लस देखील उच्च-जोखीम असलेल्या लोकसंख्येस किडनी, आणि हृदयरोग, केमोथेरपी घेत असलेल्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांकरिका फायदेशीर ठरते. इम्युनोसप्रेसेंट असलेल्या लोकांमध्ये न्यूमोनिया घातक ठरू शकतो म्हणून एखाद्या समुदायात एखाद्‌या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहिमांचं आयोजन केले आहे. असे डॉ जिनेंद्र जैन यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img