8.9 C
New York

11 Maruti Temple: समर्थ रामदासांनी स्थापन केलेले आकरा मारुती …

Published:

बलाची देवता म्हणून मारुतीची ओळख आहे. बजरंगबली, हनुमान, महाबली, बलभीम ही मारुतीची आणखी काही नावे. आज मंगळवार 23 एप्रिल. चैत्र पौर्णिमा. हनुमानाचा जन्मदिवस. यानिमित्त समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात ११ ठिकाणी (11 Maruti Temple) स्थापन केलेल्या श्री रामाचा निस्सीम भक्त हनुमानाची मंदिरे कोणती आहेत, त्याविषयी जाणून घेऊ या…


समर्थ रामदासांनी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या मारुती मंदिरांपैकी सातारा जिल्ह्यातील चाफळचा वीर मारुती हा 11 मारुतीपैकी पहिला मारुती. चाफळच्या राम मंदिरात रामापुढे हात जोडून बसलेली मारुतीची मूर्ती ही लक्षवेधी आहे. माजगावचा मारुती हा 11 पैकी दुसरा मारुती. चाफळपासून 3 कि.मी. अंतरावर माजगावात पाषाणाला समर्थानी मारुतीचे रूप दिले. सातारा जिल्ह्यातीलच शिंगणवाडीचा मारुती हा तिसरा मारुती. ज्याला खडीचा मारुती किंवा बालमारुती म्हणूनही ओळखले जातो. शिंगणवाडीचा मारुतीदेखील चाफळपासून 1 की.मी. अंतरावर टेकडीवर आहे. येथे समर्थानी मारुतीच्या छोट्याशा सुबक मूर्तीची स्थापना केली.

सातारा जिल्ह्यातील उंब्रजचा मारुती हा चौथा मारुती. याला मठातील मारुती म्हणूनही ओळखले जाते. असं मानल जातं की समर्थांना उंब्रज मधील काही जमीन बक्षीस म्हणून मिळाली होती. तिथे समर्थानी या मारुतीच्या मंदिराची स्थापना केली. चुना, वाळू आणि तागापासून तयार केलेली येथील मारुतीची मूर्ती देखणी आणि आकर्षक आहे. ह्या मूर्तीच्या पायाखाली दैत्य दिसतो. कराडजवळचा मसूरचा हनुमान हा उंब्रजपासूनही 10 की.मी. वर आहे. चुन्यापासून बनवलेली मारुतीची 5 फुटी पूर्वाभिमुखी मूर्ती अतिशय प्रसन्न आहे.


सांगली जिल्ह्यात नागांसाठी प्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळा गावात रामदास स्वामींनी स्थापन केलेले मंदिर देखणे असून मारुतीची मूर्ती अतिशय भव्य आहे. 7 फूट उंचीची ही मूर्ती चुन्याने बनवलेली आहे. सातारा जिल्ह्यातील शहापूरच्या मारुती मंदिराची रामदासांनी सर्वात पहिली स्थापना केली. मारुतीच्या शिरावर गोंड्यांची टोपी आहे. येथून जवळच रांजण खिंड आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे बोरगावचा मारुती हा 11 मारुतीपैकी आठवा. कृष्णा नदीत तयार झालेल्या बेटावर हे मंदिर वसले आहे. इथल्या मारुतीच्या स्थापनेच्या मागे एक आख्यायिका सांगितली जाते, जी रामायणाशी संलग्न आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाजवळ मनपाडळे गावात नववा मारुती आहे. 11 मारुती पैकी सर्वात दक्षिणेस असलेल्या या मारुती मंदिराची स्थापना समर्थानी केली. पाडळीचा मारुती हा वारणेच्या खोऱ्यातील दुसरा मारुती. कोल्हापूर जिल्ह्यातीलच पारगावचा मारुती, यालाच बालमारुती किंवा समर्थांच्या झोळीतला मारुती असे म्हणतात. 11 मारुतींपैकी शेवटची आणि सर्वात लहान अशी ही मूर्ती सपाट दगडवर कोरलेली मूर्ती आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img