125 किलोवरून थेट 55 किलो! महिलेने वजन कमी कसे केले? रामदेव बाबांनी सिक्रेट सांगितले!

बाबा रामदेव निरोगी आयुष्यासाठी अनेक महत्त्वाची माहिती देतात. आता त्यांनी वजन कमी करण्यासाठी पतंजलीची उत्पादने कशी मदत करू शकतात, याबद्दल सांगितले आहे. रामदेव बाबांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात सर्व माहिती दिलेली आहे.

Baba Ramdev Patanjali : भारताला आयुर्वेदाचा समृद्ध असा वारसा आहे. पूर्वी औषधी वनस्पतींच्या मदतीने रुग्णावर उपचार केले जाचे. तसेच आरोग्य चांगले राहावे यासाठी आहार आणि दैनंदीन कामाकडेही विशेष लक्ष दिले जायचे. आता मात्र काळ आणि वेळेनुसार लोक हे सर्वकाही विसरले आहेत. पण आता बाबा रामदेव हे आयुर्वेदाबाबत जागरुकता करत आहेत. बाबा रामदेव यांच्या या मोहिमेमुळे भारतातील बरेच लोक आता औषधी वनस्पतींच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तू, औषधांचा वापर करून तंदुरुस्त जीवन जगत आहेत.

रामदेव बाबा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोकांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी नेमके काय करायला हवे? याबाबत सांगत असतात. त्यांनी इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत त्यांनी एका महिलेले तब्बल 70 किलो वजन कसे कमी केले, याबाबत माहिती दिली आहे. या महिलेले पतंजलीच्या वेगवेगळ्या उत्पादनांच्या मदतीने आपले वजन कमी केले आहे.

पूजा यांनी केले 55 किलोपर्यंत वजन कमी
बाबा रामदेव यांनी लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी या महिलेची कहाणी सांगितली आहे. या महिलेने पतंजलीचे प्रोडक्ट्स वापरून तसेच योग्य तो व्यायाम करून वजन कमी केलं आहे. या महिलेचे नवा पूजा असे आहे. ही महिला सध्या ब्रिटनमध्ये राहते. अगोदर या महिलेचे वजन तब्बल 125 किलो होते. मात्र जिद्दीने या महिलेने आपल्या लठ्ठपणावर मात केली आह. या महिलेने तिचे वजन आतापर्यंत 55 किलोपर्यंत कमी केले आहे. म्हणजेच या महिलेने एकूण 70 किलो वजन घटवले आहे. पतंजलीचे काही प्रोडक्टस वापरून या महिलेने आपला डायट प्लॅन तयार केला, असे रामदेव बाबा यांनी या व्हिडीओत सांगितले आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी डायट प्लॅन तयार करणे म्हणजे जेवण सोडून देणे नाही तर योग्य संतुलित आहार घेणे असेही रामदेव बाबा आवर्जून सांगत आहेत.

पूजा नेमका कोणता व्यायाम करायच्या?
वजन कमी करण्यासाठी पूजा रोज जॉगिंग करायच्या. तसेच त्या प्राणायामही करायच्या. प्राणायाम केल्या शारीरिक तसेच मानसिक फायदे मिळतात. सोबतच त्या सूर्यनमस्कारही करायच्या. तुम्हीदेखील अशा पद्धतीची दिनचर्या चालू केली तर वजन कमी होऊ शकते, असे बाबा रामदेव यांनी या व्हिडीओत सांगितले आहे.

अनेक लोकांनी केले वजन कमी
दरम्यान, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पूजा यांच्याव्यतिरिक्त मुंबईत राहणाऱ्या पूजा अग्रवाल यांनीदेखील पतंजली केंद्रात जाऊन सांगितलेल्या नियमांचे पालन करून वजन कमी केलेले आहे. अगोदर त्यांचे वजन 100 किलो होते. रोहन गांधी नावाच्या व्यक्तीचे वजन अगोदर 172 किलो होते. आता त्यांनी आपले वजन 95 किलोपर्यंत कमी केले आहे. पतंजलीच्या या यशोगाथा वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

(टीप- आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.)

मुंबई टीम
मुंबई टीमhttps://mumbaioutlook.com
मुंबई आउटलुक ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मुंबई आउटलुक सोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे
हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हिडीओ